Covid 19: देशाची राजधानी दिल्लीसह कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या देशात 1009 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात आज एकूण 69 कोरोना बाधित नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यात नवी मुंबईत 7, पुण्यात 2 ,पिंपरी चिंचवड, रायगड, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. मागील काही दिवसात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झालाय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिक महापालिका अलर्ट मोडवर आली आहे.  (Nashik)

नाशिक महापालिका अलर्टमोडवर

संभाव्य कोरोना रुग्णाच्या चाचणीची मनपाकडून तयारीला सुरवात झाली असून महापालिका  5 हजार अँटीजन किटची खरेदी करणार असल्याचं सांगण्यात आलंय. शासनाच्या आरोग्य विभागकडे  पत्रव्यवहार करण्यात आला आहे, मात्र तिथे साठा नसल्याने मनपा  निविदा काढणार असून थेट पुरवठादारकडून  किट खरेदी करणार आहेत. अध्याप नाशिकमध्ये एकही रुग्ण नसला तरी राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नाशिक मनपा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सुरवातीला 5 हजार त्यानंतर आवश्यकतेनुसार किट खरेदी करणार आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले 

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सध्या राज्यभरात एकूण 278 सक्रिय रुग्ण आहेत. सध्याचा विषाणू हा घातक नसून सौम्य आहे. ओ मायक्रोन नंतरच्या जे एन. 1 चा हा उपप्रकार असून रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. आताचा कोरोना हा सर्दी खोकल्यासारखा सामान्य आहे अशी माहिती सात रोग तज्ञ देत आहेत. राज्यभरात सध्या एकूण 278 सक्रिय रुग्ण असून जानेवारी 2025 पर्यंत 7830 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 369 रुग्ण बाधित असून सोमवारी 69 नवीन रुग्णांची नोंद राज्यात झाली. 

नव्या रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून राजधानीत 37, ठाण्यात 19, नवी मुंबई सात पुणे दोन लातूर एक पिंपरी चिंचवड एक रायगड कोल्हापूर प्रत्येकी एक असे रुग्ण आहेत. जानेवारीपासून आत्तापर्यंत केवळ चार रुग्णांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेले रुग्ण गंभीर सहव्याधींनी बाधित होते.

हेही वाचा:

Nashik Jindal Company Fire : तब्बल 60 तासांनी आग आटोक्यात आल्यानंतर नाशिकच्या जिंदाल कंपनीला 'क्लोजर नोटीस'; पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा संशय