नाशिक: नाशिक महापालिकेत बंदुक घेऊन आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंदुक कमरेला लावून फिरणाऱ्या या कार्यकर्त्याचं नाव राहुल आरोटे आहे.
राहुल आरोटे हा नगरसेवक भागवत आरोटे यांचा भाऊ आहे. स्थायी समितीच्या निवडीवेळी ही घटना घडली.
राहुल आरोटे कमरेला बंदुक लावून महापालिका परिसरात फिरत होता. इतकंच नाही तर स्थायी सदस्य निवडीवेळी महापालिकेत बाऊन्सर्सच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येत होतं.
स्थायी समितीत भाजपला स्पष्ट बहुमत
दरम्यान, स्थायी समितीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. सभागृहात चाललेल्या गोंधळातच स्थायी सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली.
महापौर, उपमहापौरांपाठोपाठ स्थायी समितीवरही भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं.
16 पैकी 9 स्थायी समिती सदस्य भाजपचे निवडण्यात आले. त्यानंतर शिवसेना (4) काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे प्रत्येकी 1 अशा एकूण 16 सदस्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेले स्थायी सदस्य पुढीलप्रमाणे
भाजपकडून जगदीश पाटील, शशिकांत जाधव, सीमा ताजने, विशाल संगमनेरे, मुकेश शहाणे, शिवाजी गांगुर्डे, सुनीता पिंगळे, शाम बडोदे, अलका आहिरे,
शिवसेनेकडून भागवत आरोटे, सूर्यकांत लवटे, बंटी तिद्मे, डी. जी. सूर्यवंशी,
काँग्रेसचे वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले तर मनसेचे मुशीर सय्यद स्थायी समितीवर