नाशिक : मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिकचे जिल्ह्याधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची गाडी आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. 15 वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई झाली आहे.


 

मालेगावच्या 14 शेतकऱ्यांची जमीन 2001 साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या मोबदल्यात या 14 शेतकऱ्यांना नऊ कोटी 64 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पंधरा वर्ष झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही.

 

दोन वेळा सांगून ही शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने न्यायालयाने थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी आणि खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांचे वकील आणि शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते आणि जप्तीची कारवाई केली.