Nashik Car Accident : नाशिक (Nashik) शहरात आज स्टनिंग कारचा थरार पाहायला मिळाला. यात पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. तर मद्यधुंद कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाने भरधाव वेगात वाहन चालवत नाशिकच्या अंबड आणि मुंबई नाका परिसरात तीन वाहनांना धडक दिली, या घटनेत चार जण हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनचालक साहेबराव निकम याला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.


वेळ सायंकाळी साडे पाच वाजेची. नाशिक शहरातील मुंबई नाका, चांडक सर्कल परिसर. अशातच एक कार भर वेगात रस्त्यात आडव्या आयेणाऱ्या अनेक वाहनांना उडवत असल्याचा थरार अनुभवायला मिळतो. काही क्षणात प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत घडली आहे. यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मद्यधुंद कारचालकाला स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी पकडून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. अनेकांना तर आपला मृत्यू डोळ्यादेखत सर्रकन निघून गेल्यासारखे वाटले. 


दरम्यान यात अपघातात काही वाहनचालक, रस्त्याने जाणारे नागरिक, एक पोलिसही जखमी झाल्याचे समजते. दरम्यान स्थानिकांनी पकडून या कारचाकाला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडीची गती इतकी होती, की पुढचे टायर फुटून निघून पडले. मात्र तरीदेखील मद्यधुंद कारचालक आपल्याच आवेशात कार चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.


नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास एक कार चालक नाशिक पुणे महामार्गावर उपनगर परिसरातून येत होता. तो अतिशय भरधाव वेगाने कार अनेकांच्या निदर्शनास आले. या महामार्गावर त्यांनी काही वाहनांना धडक दिली. त्यामुळे काही जण जखमी झाले. त्यानंतर चालकाने वाहन अशोक मार्ग वडाळा मार्गे नाशिक मुंबई महामार्गावर कार आणली. या मार्गाने त्याने अनेकांना चिरडले. त्यानंतर तो अशाच वेगाने थेट वर्दळीचा परिसर असलेल्या चांडक सर्कल या भागात घुसला. याच दरम्यान या कारचे टायरही फुटले. तरीही हा वाहनचालक वेगाने वाहन चालत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर चांडक सर्कल परिसरात मोठा जमा गोळा झाला. त्यावेळी तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले काही जणांनी पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.


ही बातमी देखील वाचा