व्हीआयपी नंबरच्या बहाण्याने माजी मंत्री घोलपांना लाखोचा गंडा
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2018 02:30 PM (IST)
माजी मंत्री बबनराव घोलप यांना व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याच्या बहाण्याने एका इसमाने चांगलाच गंडा घातला.
नाशिक: फेक कॉल किती महागात पडू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांना व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याच्या बहाण्याने एका इसमाने चांगलाच गंडा घातला. आपण मोबाईल कंपनीमधून बोलत असून व्हीआयपी मोबाईल नंबरसाठी या इसमाने बबनराव घोलप यांच्याकडे 1 लाख 40 लाखांची मागणी केली. मात्र पैसे देऊनही घोलप यांना नंबर न मिळाल्याने अखेर घोलप यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही कोणत्याही अनोळखी नंबरवरून कोणतीही माहिती विचारण्यासाठी फोन आला तर स्वत: बद्दलची कोणतीही माहिती देऊ नका.