नाशिक :  नाशकातील व्यापाऱ्यांचा विरोध मोडित काढण्यासाठी प्रशासन सक्रिय झालं आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात नाशिक बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मालाची विक्री सुरु केली आहे.


 

शेतकऱ्यांना आडकाठी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे गाळे आणि परवाने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बाजार समितीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय.

 

राज्यातील बाजार समित्यांचा संपाचा आज तिसरा दिवस असून, फळ आणि भाजीपाला बाजार समित्यांमधून नियमनमुक्त केल्याच्या विरोधात गेल्या २ दिवसांपासून बाजार समित्या बंद आहेत.