Nashik Accident : नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात अपघाताची घटना घडली असून यात 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. सिन्नर आगारातून बस स्थानकात आली असताना बसचा ब्रेक न लागल्यानं बस थेट फलाटावर चढली. या बसच्या धडकेत भीषण अपघात झाला. अंगाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Continues below advertisement

बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर 

दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संतप व्यक्त करत रास्ता रोको केला. अपघातात जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.  मृत आदर्श बोराडे हा कुटुंबियांसमवेत देव दर्शनासाठी गेला होता. देवदर्शन करुन सिन्नरहून आपल्या गावी जण्याअधीच काळाने घाला घातला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....