सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पेहराव बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतात. केदारनाथमधील कार्यक्रमात मोदींनी घातलेलं जॅकेट सोलापुरातील कापड व्यावसायिकाने तयार केल्याची माहिती आहे.
नरेंद्र मोदींचे पेहराव कोण डिझाईन करतं, याविषयी सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. मोदींचे कपडे बहुतांश वेळा त्यांच्या चाहत्यांकडून भेट दिले जातात, विशेषतः जॅकेट. केदारनाथच्या कार्यक्रमात मोदींनी घातलेलं ग्रे लाईनिंगचा जॅकेट सोलापुरातल्या एका कापड व्यावसायिकाने पाठवलं होतं.
प्रसिद्ध कापड व्यावसायिक आणि टेलर किरण येज्जा यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना हा दावा केला. येज्जा यांच्याकडे टेरी उल कापडाची मोनोपॉली आहे. या कापडाने तयार केलेलं हे जॅकेट त्यांनी कुरिअरने पाठवलं होतं.
या कापडाची किंमत चार हजार प्रतिमीटर असून शिलाईसह जॅकेटचा एकूण खर्च 15 हजारांच्या घरात जातो. किरण येज्जा यांनी दुसऱ्यांदा मोदींसाठी खास जॅकेट पाठवलं आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींचं 'ते' जॅकेट सोलापूरच्या कापड व्यावसायिकाकडून भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2018 11:46 PM (IST)
केदारनाथच्या कार्यक्रमात मोदींनी घातलेलं ग्रे लाईनिंगचा जॅकेट सोलापुरातल्या एका कापड व्यावसायिकाने पाठवलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -