नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीम अॅप रेफरल योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहकाने भीम अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला दहा रुपये मिळणार आहेत.

14 ऑक्टोबर 2017 पर्यंत भीम अॅप रेफरल योजना सुरु राहणार आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहकाने भीम अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला दहा रुपये मिळतील. अशाप्रकारे रोज 20 जणांना भीम अॅपचं महत्त्व समजावून डाऊनलोड करायला लावल्यास दिवसअखेर दोनशे रुपयांची प्राप्ती तुम्हाला होईल, असं मोदी म्हणाले.

युवकांना डिजीटल पेमेंटकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना आणल्याचं मोदी सांगतात. समर व्हेकेशनमध्ये जॉब करण्याऐवजी अशाप्रकारे महिन्याअखेर हजारो रुपये कमवण्याची संधी असल्याचंही नरेंद्र मोदींनी सांगितलं. भीम अॅप हा अर्थव्यवस्थेतला महारथी असून त्याचे वापरकर्ते भ्रष्टाचारविरोधी शिलेदार असल्याचं मोदी म्हणाले.

सुखवस्तू कुटुंबातही मुलांना वाईट सवयी लागू नयेत म्हणून कमी रोकड देतात. कमी रोकडीचं महत्त्व कौंटुबिक स्तरापासून मोठमोठ्या व्यवहारापर्यंत असल्याचं मोदी म्हणाले. नोटाछपाईसाठी अब्जावधी रुपये खर्च होतात. अशा शब्दात डिजीटल पेमेंटचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

पाच वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. पुढील पाच वर्षात प्रत्येक तरुणाने देशाचा विकास करण्याचं उद्दिष्ट बाळगावं, म्हणदजे तोपर्यंत प्रत्येक गरीबाकडे स्वतःचं घर असेल, असं मोदी म्हणाले.

देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळाली नाही, पण देशासाठी जगण्याची संधी मिळाली, असं मोदी म्हणाले. त्या काळी फास कमी पडले, पण भारतमातेसाठी बलिदान देणाऱ्यांची देशाला कधी कमतरता नाही, असंही

बाबासाहेबांचं आयुष्य गरीबांसाठी कायम प्रेरणादायी ठरलं. बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवर येण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य मिळालं. बाबासाहेबांना जीवनात क्षणोक्षणी विष मिळालं, पण त्यांनी अमृताचा वर्षाव केला, अशा शब्दात मोदींनी महामानवाला मानवंदना दिली.