मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात मारण्याची भाषा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आज सकाळी राणे विरुद्ध शिवसेना वादाचा पुढचा अंक आज रस्त्यावर पाहायाला मिळाला. एकीकडे नाशिक आणि पुणे पोलिसांचे राणेंना अटक करण्याचे आदेश आणि दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमक आंदोलनं यामुळे भाजप-शिवसेनेला सामना आज सकाळपासून रंगला. त्यातही मुंबईत राणेंच्या निवासस्थानासमोर आणि चिपळूणमध्ये राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेसमोर दोन्ही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि पोलिसांना त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.


राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू इथल्या बंगल्याबाहेर युवासेनेनेनं जोरदार आंदोलन केलं. यावेळी भाजप आणि युवासेना कार्यकर्ते आपापासात भिडल्याचं पाहायला मिळालं. समोरासमोर आल्यानंतर युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या राड्यात पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. यांत दोन पोलीसही जखमी झाल्याचं कळतंय. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे.



मिरा भाईंदर आणि वसई, विरार, नालासोपारा शहरात ही नारायण राणे विरोधात आंदोलन


मिरा भाईंदर आणि वसई, विरार, नालासोपारा शहरात ही नारायण राणे विरोधात आंदोलन करण्यात आले. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत शिवसैनिकांनी वसईतील माणिकपूर, तर नालासोपारातील तुळींज पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे. तसेच नालासोपारा पूर्वेकडे तुळींज येथे शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या फोटोला चप्पलाने मारत आंदोलन केलं आहे. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी अश्लील घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे. तर वसई विरार मध्ये यापुढे नारायण राणेंची एकही सभा होवू देणार नसल्याचा आक्रमक पविञा शिवसैनिकांनी घेतला आहे. मिरा रोड येथे ही प्रभाग क्रमांक 13 चे शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जीसीसी क्लब येथे नारायण राणे यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्याच्या फोटोला काली शाई फासण्यात आली.


जालन्यात युवासेनेच्या वतीने कोंबड्या घेऊन जोडे मारो आंदोलन


 वाशिम शिवसेनेच्यावतीने वाशिम शहरातील  मुख्य पाटणी चौकात कोंबड्या दाखवून  आंदोलन करण्यात आले यावेळी कोंबडी चोर अश्या घोषणा ही देण्यात आल्या ,वाशिम पोलिसांनी आंदोलन करण्याऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात  घेण्यात आले  


शिवसेनेच्या आंदोलनाला गालबोट,पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.


धुळ्यात शिवसेनेच्यावतीने नारायण राणे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शिवसेनेच्या कार्यालयापासून धुळे महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आली. ही अंत्ययात्रा धुळे महानगरपालिकेजवळ आल्यानंतर याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरु केले. यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यान वर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर काठ्या भिरकावल्या, हा वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सतर्कता दाखवत दोन्ही बाजूची गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवले. पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झाले. यावेळी धुळे महानगर पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह विविध पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी दाखल झाले. दरम्यान या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. या घटनेनंतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले असून दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


जालना युवासेनेच्या वतीने कोंबड्या घेऊन जोडे मारो आंदोलन


शहरातील अंबड चौफुली रस्त्यावर युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करत कोंबड्या घेऊन नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.


बीड शहरामध्ये शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचा निषेध


 शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढली तर दुसरीकडे बीड शहरामध्ये शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचा निषेध केला तर बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी नारायण राणे यांचा शिवसैनिकांनी निषेध करत माजलगाव मध्ये देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे तर बीडमध्ये नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून नारायण राणे यांची गाढवावरून धिंड काढून जोपर्यंत राणे माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे