मुंबई : जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेतल्याप्रकरणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मात्र खडसेंची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा बळी घेतल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.

 
इतके गंभीर आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, असं नारायण राणे म्हणाले. खडसेंचा राजीनामा हा बहुजन समाजावर अन्याय आहे, असं म्हणत बहुजन नेतृत्वाला टार्गेट केलं जात असल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंचा बळी घेतल्याचा निशाणाही राणेंनी साधला.

 

 

अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचं च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.

 

 

खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.

 

 

खडसेंची मंत्रिपदं कोणाला?

 

 

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या जागी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता ‘एबीपी माझा’कडे विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. खडसेंऐवजी विदर्भातील नेता आणि बहुजन चेहरा हे जाती-पातीचं, विभागाचं गणित सोडवण्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसमोर आहे. त्यामुळे विदर्भातील आणि बहुजन चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव समोर येत आहे.

 

 

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे महसूलमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. तसंच त्यांचा शपथविधीही येत्या 15 जून रोजी होणार असल्याचीही माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र खडसेंकडील उर्वरित मंत्रिपदं कोणाकडे जाणार,याबाबतची उत्सुकता कायम आहे.

 

 

सध्या मुनगंटीवारांकडे कोणती खाती?

 

 

सध्या सुधीर मुनगंटीवारांकडे अर्थ आणि नियोजन तसंच वनमंत्रीपद आहे.

 

 

संबंधित बातम्या


खडसेंच्या जागी मुनगंटीवार निश्चित, 15 जूनला पद स्वीकारणार?


अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा, सर्व मंत्रिपदं सोडली 


तथ्यहीन आरोपांना उत्तर देणार नाही : खडसे


खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन


‘तो’ अहवाल खडसेंच्या बाजूनंही असू शकतो: रावसाहेब दानवे


खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील


सबळ पुराव्यांशिवाय खडसेंवर बोलणार नाही, अण्णांची भूमिका


खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण


विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला


एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना


एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?


खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला


मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता


ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण


..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे


खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात


गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील


‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’


खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण


खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?


दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर