मुंबई: कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) प्रकरणी राणे पिता पुत्रामध्ये दुमत असल्याचं दिसून आलं. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रविवारी शरद मोहोळवर टीका केली होती, तो देशाचा मोठा नेता आहे का अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तर त्याचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी शरद मोहोळचे उदात्तीकरण केल्याचं दिसून आलं. शरद मोहोळने हिंदुत्वासाठी आभाळाएवढं काम केल्याचं सर्टिफिकेट देताना त्याची प्रतिमा चुकीची दाखवू नका असंही आवाहन केलं होतं. राणे पिता-पुत्राच्या मतभिन्नतेच्या या वक्तव्याची चर्चा मात्र सुरू आहे.


कोण तो गुंड? काय म्हणाले नारायण राणे? 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद मोहोळला देण्यात येणाऱ्या प्रसिद्धीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ती एक हत्या झाली, कोण तो मेला, मोहोळ. तो काय कुणी विद्धान होता का? तो काय देशाचा मोठा नेता होता का? सकाळ संध्याकाळ त्याच्याच बातम्या दाखवल्या जात आहेत.


मोहोळचं काम आभाळाएवढं, काय म्हणाले नितेश राणे?


एकीकडे नारायण राणे यांनी शरद मोहोळला गुंड म्हणत त्याच्यावर टीका केली. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळ याचे काम आभाळाएवढं असल्याचं गुणगाण गायलं. ते म्हणाले की, रात्री बेरात्री कुठेही हिंदु समाजावर संकट आलं तरी शरद मोहोळ कुटुंबीय उभे राहिले आहेत. शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावं. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करत आहेत.


नितेश राणे पुढे म्हणाले की, शरद मोहोळ यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची आहे, त्या बद्दल मोहोळ कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये अशी विनंती मी करतो.


राणे पिता-पुत्रामध्ये मतभिन्नता?


कुख्यात गुंड शरद मोहोळची गेल्या आठवड्यात भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या साथिदारांनीच त्याची हत्या केली असल्याचं समोर आलं. त्यानंतर मात्र काही राजकीय नेत्यांनी तो कसा मोठा होता याचे गुणगाण गायला सुरू केलं. शरद मोहोळ हा हिंदुत्ववादी होता, त्याने हिंदुत्वासाठी काम केल्याचं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. त्या आधी भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी सोलापुरातील हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या वेळी शरद मोहोळ हा हिंदुत्ववादी असल्याने त्याची हत्या झाल्याचं सांगितलं. 


शरद मोहोळच्या हत्येच्या बातम्यांवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. शरद मोहोळ कोण विद्वान होता का असा प्रश्न विचारला. 


ही बातमी वाचा:



Narayan Rane Vs Nitesh Rane : मोहोळवरून राणे पिता-पुत्रात दुमत? थोरल्या राणेंची शरद मोहोळवर टीका