नंदुरबार: नंदुरबारमध्ये पावसापाठोपाठ आता एका अफवेने काहूर उठलं आहे. वीरचक्र धरण फुटल्याच्या अफवांना गावात ऊत आला आहे. यामुळे पाचोराबारी गावातील नागरिकांची घाबरगुंडी उडाली असून जीव वाचवण्यासाठी लोकांची धावाधाव सुरु आहे.

 

गेल्या काही दिवसात पाचोराबारी गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच आता धरण फुटल्याच्या अफेवनं थैमान घातलं आहे. मात्र अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी गावात ठाण मांडून बसले आहे.

 

दरम्यान, तीन दिवसांनंतर सूरत-भुसावळ रेल्वेमार्ग पुन्हा सुरु झाला आहे. पाचोराबारी गावाजवळ रुळाखालील माती खचल्याने याठिकाणी रेल्वेचे काही डबे घसरले होते.