नांदेडमध्ये एससी, एसटी आणि ओबीसींचा महामोर्चा
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2016 10:58 AM (IST)
नांदेड : नांदेडमध्ये आज एससी, एसटी आणि ओबीसींचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल न करण्याची प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ नये, कोपर्डीसह सर्व बलात्काराच्या आरोपींना फाशी दिली जावी, ओबीसी आरक्षणात इतरांचा समावेश करु नये, यासह अनेक मागण्या या मोर्चात करण्यात येणार आहेत. शहरातील नवामोंढा मैदानावरुन या महामोर्चाला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा विसर्जित होणार आहे. शनिवारी याच मागण्यांसाठी बीडमध्ये दलित समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता.