नांदेड : नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं.

दोन पोलीस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 20 पैकी 12 आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.