नांदेड : राज्यात दोन दिवसांचं वीकेंड लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊन दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीला दंड लावल्यावरून पोलिसावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याच्या नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आज वीकेंड लॉक डाऊन सुरू केलाय. या दरम्यान  नागरिकांनी बाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. तर विनाकारण व विनामास्क बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दंड ही ठोठावण्याची कारवाई स्थानिक प्रशासनाकडून केली जात आहे. आज नांदेड व परभणी सीमेवर चेक पोस्टवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरूद्ध कारवाई करत  दंड ठोठावला. यावेळी एका दुचाकी चालकाने दगड फेकून मारल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. प्रभाकर कच्छवे असं पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून ते  चुडावा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 


Corona | देशात कोरोनाची दुसरी लाट भयंकर, गेल्या वर्षीच्या तुलनेत गंभीर रुग्णांची संख्या वाढली


प्रभाकर कच्छवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी अवस्थेतील कच्छवे यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून आरोपी दुचाकी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :