पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी नांदेडमध्ये पोलिस निरीक्षकावर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2016 03:30 PM (IST)
नांदेड : आत्महत्या करणाऱ्या पत्नीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात सोडून पोलीस निरीक्षकानं पोबारा केल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीस आलीय. या प्रकरणी पत्नीच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कित्तेविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. शिवप्रसादची पत्नी संगीता कित्तेनं गळफास लावून आत्महत्या केली. संगीतानं माहेरुन 27 लाख रुपये आणावे म्हणून शिवप्रसादनं तिचा छळ मांडला होता, अशी तक्रार संगीताच्या नातेवाईकांनी केलीय. याच छळाला कंटाळून संगीतानं आत्महत्या केल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यास विलंब होत असल्याचा आरोप होतोय.