ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
1.मुंबईतील आझाद मैदानात पोहोचलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आणखी एक दिवसांची मुदतवाढ, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, उपोषण सुरू होताच जरांगेंचा एल्गार, आझाद मैदानावर जनसागर https://tinyurl.com/2ws6ysjr इथेच उपोषण करून मेलो तरीही मागे हटणार नाही, आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना https://tinyurl.com/mr42jatt
2. मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक, लोकशाही मार्गाने चालणारं आंदोलन रोखण्याचा प्रश्न नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ठाकरे-पवारांनी मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावू नये, फडणवीसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/ye9rrvuh मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, कायद्याच्या चौकटीत बसेल ते मराठा समाजाला देण्याची तयारी https://tinyurl.com/mrxuafyx
3. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई थांबली, रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सायन-पनवेल हायवेसह फ्री वेवर वाहतूक कोंडी, दक्षिण मुंबईचा परिसर भगवा https://tinyurl.com/kmaaykw5 मुंबईतील सीएसएमटीवर मराठा आंदोलकांची गर्दी, 'एक मराठा-लाख मराठा'च्या घोषणांनी स्थानक दणाणलं https://tinyurl.com/4jjmw2rv
4. मराठा बांधवांनी गोंधळ घालू नये, मुंबईत गर्दी न करता वाशीला जावं, मनोज जरागेंचे आवाहन https://tinyurl.com/52y2ud6k
5. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची, थेट जरांगेंशी चर्चा करा, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, आंदोलक दहशतवादी नाहीत तर मराठी माणूस, ठाकरेंची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/z2j9e67e शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, भाजपचे आवाहन, विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप https://tinyurl.com/595eb5vx
6. मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई व्हावी, अॅड. गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत धाव https://tinyurl.com/3vbesd5z फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी विरोधकांसह अजित पवारांचे आमदारही सामील, लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप https://tinyurl.com/mau4y3hn मनोज जरांगे यांच्या मागणी विरोधात ओबीसी महासंघाचा एल्गार; राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, डॉ.बबनराव तायवाडे यांची आग्रही मागणी https://tinyurl.com/4ua8fc5m
7. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, शेतकरी मेळाव्यादरम्यानची घटना, संभाजी ब्रिगेडचे दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/3a22k578 अज्ञाताने संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या कानशिलात लगावली, आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल https://tinyurl.com/3fhbhtx3
8. मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत, नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीत तुफान पाऊस https://tinyurl.com/57p692s4 मराठवाड्यात झालेल्या नुकसानीवर सरकार सर्वोतपरी मदत करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://tinyurl.com/3d8xsaax
9. गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, गाईसह म्हशीच्या दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ https://tinyurl.com/mu6zdh2b लवकरच रिलायन्स जिओचा IPO बाजारात येणार, मुकेश अंबानींची AGM मध्ये मोठी घोषणा https://tinyurl.com/44pc5p3d
10. रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीव शुक्ला यांच्याकडे कार्यवाहक अध्यक्षपदाची जबाबदारी https://tinyurl.com/4rmc9nz4 हरभजन सिंगने एस श्रीसंतला कानाखाली मारल्याचा Video 18 वर्षानंतर व्हायरल, ललित मोदींकडून पोस्ट शेअर https://tinyurl.com/mubz7b4r
एबीपी माझा स्पेशल
जालन्यातील शाहगडमध्ये वास्तव्य, आरक्षणाच्या लढ्यात 2.5 एकर जमीन विकली; कोण आहेत मनोज जरांगे पाटील? https://tinyurl.com/mvbtjc8z
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w