नांदेड : माहूर तालुक्यातील दत्त मांजरी येथे क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाने छोट्या भावाच्या पोटात सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सख्या भावांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात पोटात सुरा भोसकून खून केल्याची घटना माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथे घडलीय. 


माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे रामेश्वर बाबूलाल जाधव व ज्ञानेश्वर बाबूलाल जाधव या दोन सख्ख्या भावात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. सदर वादाचे हाणामारीत रुपांतर झाल्याने आरोपी रामेश्वर बाबूलाल जाधव (वय 27) याने रागाच्या भरात  त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर बाबूलाल जाधव (वय 25)  याच्या पोटात सुरा खुपसला. त्यामुळे रक्तस्त्राव सुरु झाल्याने जखमी ज्ञानेश्वर बाबूलाल जाधव याला गावातील लोकांनी उपचारासाठी माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.


यात अक्षय उत्तम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माहूर पोलीस ठाण्यात आरोपी  रामेश्वर बाबूलाल जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सख्या भावानेच भावाचा काटा काढल्यानं भावाच्या या नात्याला काळिमा फासल्याची घटना घडील आहे. या घटनेमुळे गावात मात्र हळहळ व्यक्त होत आहे.


महत्वाच्या बातम्या् :