Nanded : रोजगार हमी योजनेअंतर्गत (Employment Guarantee Scheme) बांधलेली विहीर महिनाभरातच ढासळल्याचा प्रकार नांदेडच्या (Nanded) रुई गावात घडला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याने (Farmers) सिमेंटच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित करुन न्याय देण्याची मागणी केली आहे. विहीर महिनाभरातच ढासळल्यानं कामाच्या कार्यपद्धतीसह, विहीर बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या मालवर शंका व्यक्त करण्यात येत आहे.
नायगांव तालुक्यातील रुई येथील कामाजी मुकादम या शेतकऱ्याला रोहयो योजने अंतर्गत विहीर मंजूर झाली होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्याला शासनाच्या अनुदानाचा रुपयाही अद्याप मिळाला नाही. या शेतकऱ्याने जवळच्या पैशातून विहिरीचे काम पूर्ण केले, पण अचानकपणे विहीर ढासळल्याने या शेतकऱ्याचे साडे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चौकशी करुन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
रोजगार हमी योजनेबाबत माहिती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मगांराग्रारोहयो) महाराष्ट्रात समस्त ग्रामीण भागात राभवली जाते. या योजनेच्या सहाय्याने देशातील बेरोजगार तरुणांना सरकारतर्फे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक मदत केली जाते. ही योजना खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना आत्मनिर्भर होण्यास मदत करते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खेडेगावातील प्रत्येक गरजू कुटुंबातील इच्छुक तरुणांना प्रत्येक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देते. लाभार्थी याद्वारे आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून देतात. सहसा ही योजना श्रमदान च्या स्वरूपात असते. मगांराग्रारोहयो योजना ग्रामीण नागरिक, महिला व दुर्बळांचे सशक्तिकरण, शेतकरी व मजुरांचे आर्थिक रित्या मदत करून ग्रामीण भागाचा विकास सुनिश्चित करते. या योजनेमुळे रोजगाराचे साधन नसलेल्या अनेक कुटुंबांची रोजगाराची समस्या दूर होते.
रोजगार हमी योजना सर्वप्रथम वसंतराव नाईक यांनी सुरू केली. वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लांब कार्यकीर्द (1963 - 1975) असलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या शेती क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक आणि श्वेत क्रांतीचे जनक मानले जाते. एवढेच नाही तर 1 जुलै ही त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. 26 जानेवारी 1969 रोजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेची पायाभरणी केली. 1942 मध्ये जेव्हा दुष्काळाचे संकट लोकांवर आले. त्यावेळी रोजगार मिळणे हे अतिशय कठीण झाले. अशा संकटकाळी वसंतराव नाईक यांनी मांडलेली रोजगार हमी योजना राभविण्यात आली. योजना अतिशय यशस्वी ठरली आणि म्हणून 1970 मध्ये रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी झाली. पुढे 2005 रोजी ही योजना संपूर्ण भारतात लागू झाली.
विविध कारणामुळं आधीच शेतकरी चिंतेत
विविध कारणामुळं आधीच शेतकरी चिंतेत आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशातच पुन्हा अशी संकट येत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई देखील पाहायला मिळत आहे. अशा काळात शेतकरी पाण्याची व्यवस्था करण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या: