Santosh Deshmukh Case Kalamb News बीड: कळंब येथील महिला (kalamb women died) मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातूनच झाल्याची माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. सदर प्रकरणात रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींनी हत्येबाबत कबुली दिल्याची माहिती धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी दिली. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनैतिक संबंध असल्याचं दाखवण्यासाठी महिलेचा वापर केला जात होता का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यास यावर तपासाचा भाग असल्याच सांगत पोलिसांकडून बोलण्यास नकार दिला.  

महिलेने आरोपीला ते व्हिडीओ दाखवले, उठाबशा काढायला लावल्या-

सदर घटनेबाबत आरोपी रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले याने पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती सांगितली. काही आक्षेप असलेले व्हिडीओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. 22 मार्च रोजी हत्या घडली, त्या दिवशी देखील महिलेने आरोपीला उठाबशाही काढायला लावल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला. तसेच मृतदेहाच्या शेजारी बसून त्याने जेवणही केलं. तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला आणि  केज येथे पोहचला. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. 

नेमकं प्रकरण काय?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याचे कोणालाही कळू नये, यासाठी बीड पोलिसांकडून एक घाणेरडा कट रचण्यात आल्याचा आरोप मध्यंतरी झाला होता. संतोष देशमुख यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामधूनच त्यांची हत्या झाली, असा बनाव रचण्याचा कट पोलिसांनी आखल्याचे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी म्हटले होते. याप्रकरणातील ज्या महिलेशी संतोष देशमुख यांच्याशी अनैतिक संबंध दाखवायचा कट होता, त्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. 

सदर महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे करायची काम-

सदर महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची असा दावा सामजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. 

१) मनीषा आकुसकर, आडस

२) मनीषा बिडवे, कळंब

३) मनीषा मनोज बियाणी, कळंब

४) मनीषा राम उपाडे, अंबाजोगाई

५) मनीषा संजय गोंदवले, रत्नागिरी

आरोपी मृतदेहासोबत 2 दिवस त्याच खोलीत राहिला, VIDEO:

संबंधित बातमी:

मोठी बातमी: कळंबमध्ये महिलेच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपला, तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने बाहेर पडला, आरोपीची थरारक कबुली

संतोष देशमुखांना खोट्या अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन कसा रचला?; बैठकीत उपस्थित असलेल्या व्यक्तीनेच सांगितला, गोपनीय साक्ष समोर!