नांदेडमध्ये मराठा समाजातर्फे मूकमोर्चाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 09:21 AM (IST)
नांदेड : नांदेडमध्येही कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ आज मराठा समाजातर्फे मूकमोर्चा काढण्यात येत आहे. सकाळी 11 वाजता सुरु होणाऱ्या या मोर्चाला नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. तरुणी, महिला, विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळत आहे. शनिवारीच हिंगोलीत मराठा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी भव्य जनसमुदाय जिल्हा परिषदेच्या मैदानावर दाखल झाला होता. हिंगोलीतील मोर्चाला दुपारी एक वाजताची वेळ देण्यात आली होती, मात्र सकाळी आठ वाजल्यापासूनच अनेक जण मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या मैदानात दाखल होत होते.