Nanded: राज्यातील बहुतांश मोठ्या धरणांची पाणीपातळी सध्या झपाट्याने खालावत आहे. नांदेड शहराची तहान भागवणारे सर्वात मोठे विष्णूपूरी धरण सध्या 40.46% पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या हा पाणीसाठा मुबलक असला तरी सध्या नांदेडकर नळाला ड्रेनेजमिश्रीत पाणी येत असल्याने वैतागले आहेत. दुषीत पाण्यामुळे नांदेड पालिकेचा गहाळ कारभार समोर येत आहे. सोलापूरमध्ये दूषीत पाण्यामुळे दोन मुलींचा जीव गेल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये नळाला येणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्यावरून नागरिकांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पालिकेला जाग आली आहे. दरम्यान, येत्या 15 दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचं महापालिका आयुक्त डॉ महेश डोईफोडे यांनी सांगितलंय. (Drainage Water)
खोदकामामुळे दूषित पाणी, आयुक्त म्हणाले...
नांदेड शहरात आज सकाळी स्वछ पाणी मिळावे यासाठी आज पाण्याचा टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनासंदर्भात आयुक्त डोईफोडे याना विचारले असता काही ठिकाणी ड्रेनेज आणि रोडचे काम सुरू आहे खोदकामामुळे असे होऊ शकते त्या आता दुरुस्ती काम सुरू केलं आहे, त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिले आहे. शहराची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. आजघडीला 40.46 टक्के म्हणजेच 32.69 दलघमी पाणी आहे. विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्याचे सुद्धा फिडरचे काम सुरू आहे. येत्या 15 दिवसात पूर्ण होईल त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ महेश डोईफोडे यांनी सांगितले.
पाण्यासाठी मागणी जास्त झाली ज्या वस्तीत पाईप लाईन संपत आहे, त्या ठिकाणी वाढीव वेळ देऊन पाणी देण्याचा नियोजन महापालिकेने घेतला आहे. सध्या महापालिकेचे टँकरने पाणी पुरवठा करत नाही जर पाणी पुरवठा होत नसेल त्या ठीकणी महापालिकेचे मालकी टँकर द्वारे पाणी पुरावठा करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
नांदेडकरांना अजून 15 दिवस सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी थांबावे लागणार
नांदेड शहरातील मगनपुरा भागात चक्क ड्रेनेज मिश्रीत पाणी नळाला येत आहे. गेल्या 1-2 महिन्यापासून नळाला घाण पाणी येत असल्याने स्थानिक नागरिक आज सकाळीच पाण्याचा टाकी वर चढले. स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी नागरिकांनी हे शोले स्टाईल आंदोलन केले. त्यानंतर मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी यांना नागरिकांनी घेराव घातला. आम्हाला जर शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही तर पुढील आंदोलन तीव्र करू असा इशारा मगनपूरा भागातील नागरिकांना दिलाय. दरम्यान येत्या 15 दिवसात काम दुरुस्ती करून नंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आयुक्तांनी सांगितल्यानंतर आता नांदेडकरांना आणखी 15 दिवस सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
हेही वाचा: