नांदेड : हद्दीचं कारण सांगून कारवाईत टाळाटाळ करणं हा जणू पोलिस खात्याचा जन्मसिद्ध हक्क आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. नांदेड पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे एका व्यक्तीचा मृतदेह तब्बल सात तास एकाच ठिकाणी पडून राहिला.


 
नांदेड शहराच्या लालवाडी भागातील रेल्वे ट्रॅकजवळ एका अज्ञात इसमांचं प्रेत आढळून आलं. संबंधित मृतदेह दोन रेल्वे रुळांच्या मध्ये नसल्यानं आमच्या हद्दीत नाही अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. मयत इसमाच्या शेजारी नांदेड ते परभणी प्रवासाचे तपोवन एक्सप्रेसचे तिकीट आढळून आले आहे

 
वजिराबाद आणि भाग्यनगर पोलिस यांच्यात हद्दीचा वाद जुंपला. सकाळी दहा वाजताच्या सुमारास सापडलेला मृतदेह सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुळांजवळ पडून होता. या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला.