नांदेड : तामसाजवळील टाकरस जंगलात एकाच कुटुंबांतील बाप, मुलगा आणि पत्नीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत. यातील दोन मृतदेह हे खाली जमिनीवर तर एक मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या पंचनाम्याची प्रक्रियेला सुरुवात केली आहे.


यातील जमिनीवरील मृतदेहांना दगडाने ठेवल्याचं असल्याचे निदर्शनास आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून पतीनेच आपल्या पत्नी व मुलाची हत्या करून स्वत: फाशी घेतली असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मयत महिलेचे नाव सिमा शांतामन कावळे (40) तर मुलाचे नाव सुजित शांतामन कावळे (17) असे आहेत. या मृतदेहांच्या शेजारीच असलेल्या झाडाला शांतामन सोमा कावळे 45 वर्षे असे मयत पुरुषाचे नाव आहे.


पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार आठ ते दहा दिवस अगोदर घडलेला आहे. आज जिल्ह्यातील सर्व पोलीस दल 6 डिसेंबरच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असताना ही माहिती समोर आली. टाकरस शिवारातील जंगलात एक महिला आणि एका बालकाचा मृत्यदेह खाली पडलेला आहे आणि एका व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने जंगलातील झाडाला फाशी घेतलेली आहे अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. घटना पाहणाऱ्या माणसाने त्वरीत ही माहिती तामसा पोलीसांना दिलीय होती. 


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha