नांदेड : सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सुरुवात झाली आहे. मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह लोकसभेतील एकूण  17 खासदारांना  लागण झाली आहे. या सगळ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लोकसभेतील 17 आणि राज्यसभेतील 8 अशा एकूण 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पण यात महत्वाचे म्हणजे नांदेड लोकसभेचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

संसदेच्या पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आहे. कोरोना काळात अधिवेशन असल्याने सर्व खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात अनेक खासदार पॉझिटिव्ह निघाले. पण नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह निघाले आहेत. यावरुन आता दुसऱ्यांदा कोरोना होत नाही असा दावा खोटा ठरला आहे.

प्रताप पाटील चिखलीकर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या कुटुंबात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण आपली तब्येत ठणठणीत असल्याचा मेसेज त्यांनी स्वत: एका व्हिडीओद्वारे दिला आहे. तसेच माझ्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये असेही त्यांनी सांगितले आहे.

Continues below advertisement

मार्च महिन्यापासूनच चिखलीकर चिखलीकर सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 11 सप्टेंबर रोजी चिखलीकर यांनी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अचानक जाऊन रुग्णालयाची तपासणी केली. यावेळी अनेक कोरोना बाधितांवर बेजबाबदारपणे उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. लगेचच त्यांनी प्रशासनाची कानउघाडणी करत तिथल्या परिस्थितीवर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात आजवर अशोक चव्हाण, मोहन हंबर्डे, माधवराव जवळगावकर, अमरनाथ राजूरकर हे आमदार पॉझिटिव्ह आले होते. पण यावेळी खासदार चिखलीकर हे अपवाद ठरले असून दोनदा पॉझिटिव्ह आले आहेत.

1) अशोक चव्हाण, आमदार : कोरोनामुक्त

2) मोहन हंबर्डे, आमदार :कोरोनामुक्त

3) अमरनाथ राजूरकर, आमदार :  कोरोनामुक्त

4) माधव जवळगावकर, आमदार : कोरोनामुक्त

5) प्रवीण पाटील चिखलीकर, नांदेड जिल्हा परिषद सदस्य : कोरोनामुक्त

6) प्रताप पाटील चिखलीकर, खासदार : उपचार सुरु