नांदेड  : नांदेड जिल्ह्यातील भोकर ते हिमायतनगर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे.  लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या  टेम्पोला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या भीषण  अपघातात नवरीसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सहा ते सात जणांचा मृत्यू झाला आहे. 


ही घटना आज सायंकाळी सात वाजता घडलीय. उमरी  येथील लग्नाचे वऱ्हाड हे हिमायतनगरहून मुंबई कडे जात असताना भोकर तालुक्यातील सोमठाणा ते राजवाडी पाटी दरम्यान हरिभाऊ ढाब्याजवळ ओव्हरटेक करताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये  प्रवासी वाहन आणि  टेम्पोच्या भीषण अपघातात प्रवासी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.  ज्यामध्ये नवरीसह  आठ जणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.  वऱ्हाडी हे उमरी तालुका जारीकोट या गावातील  आहे.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...