Namdev Shastri majha katta : दोन चमत्कारामुळं ज्ञानेश्वर माऊलींचे नुकसान झाले आहे. भिंत चालवणे आणि रेडा बोलवणे या दोन प्रसंगामुळं शिकलेले लोकं ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) वाचत नसल्याचे मत भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी व्यक्त केले. गेल्या 700 वर्षात ज्ञानेश्वरीला क्रॉस करणारा एकही माणूस जन्माला आला नाही, हादेखील एक चमत्कार असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरीत मानसशास्त्र आहे. आपण चुकीचं करतोय की बरोबर करतोय याची परीक्षा ज्ञानेश्वरीत घेऊ शकता असे नामदेवशास्त्री म्हणाले. नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. 


ऊसतोड कामगार भगवान गडाला जपतात


ज्ञानेश्वरीमध्ये जगातील सर्व प्रकारची माणसे आहेत. आपण नेमकं काय केलं पाहिजे याचे विवेचन ज्ञानेश्वरीत करण्यात आल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरी विचार शिकवते. दरम्यान, भगवान गडावर ज्ञानेश्वर महाराजांचे भव्य मंदीर उभारलं जात आहे. यासाठी फक्त ऊसतोड कामगारांनी देणगी दिल्याचे नामदेवशास्त्री यांनी सांगितले. भगवानगडाचे महंत होण्यासाठी पहिली अट ही ब्रम्हचारी असावं लागतं. ऊसतोड कामगारांनी मोठी देणगी दिल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ऊसतोड कामगार गडाला जपतात आणि शिकलेली माणसं गडाकडे दुर्लक्ष करतात असे नामदेवशास्त्री म्हणाले. 


जबरदस्तीने गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या गादीवर बसवलं


ज्ञानेश्वरी तुम्हाला विचार प्रदान करते. त्यामुळं ज्ञानेश्वरी वाचावी. भगवान गडावर येणारा माणूस अंधश्रद्धाळू नाही. भगवान गडाची जागा ही तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे. माझी भगवान गडावर बसण्याची इच्छा नव्हती. हे मी अनेवेळा गडावर बोललो आहे. मला जबरदस्तीने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या गादीवर बसवल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीच वाईट भावना येणार नसल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. 


धनंजय मुंडे गडाला मदत करतात


ऊसतोड कामगार आणि शेतकरी भगवानगड सजवतात. भगवानगड हा त्यांचा आहे. मी केवळ वॉचमन असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ऊसतोड कामगार आणि शेतकरी गडाला सजवतात, त्यातील एक धनंजय मुंडे असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ते गडाला मदत करतात. धनंजय मुंडे यांच्या आई भगवानबाबांच्या शिष्य आहेत, असेही नामदेवशास्त्री म्हणाले. पंकजा मुंडे यांना मतदारांनी स्वीकारलं पाहीजे, भगवानगडाने नाही. 


महत्त्वाच्या बातम्या:


Namdev Shastri : ज्ञानेश्वरी आणि गाथ्यानं 'मराठी' जीवंत ठेवली, नामदेवशास्त्रींनी सांगितली माऊलींच्या ज्ञानामृतीची गोष्ट