नागपूर: नागपूरच्या यशोधरानगर परिसरातील निकीता फार्मास्युटिकल्सच्या छोट्या मेडिसिन युनिटमध्ये स्फोट झाला असून या स्फोटात पाचजण जखमी आहेत.

आधिक माहितीनुसार, उप्पलवाडी इंडस्ट्रीयल ऐरियात असलेल्या वाजंरा ले आऊट परिसरात केमिकल इंडस्ट्री आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कंपनीत मोठा आवाज होऊन आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या दुर्घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. या जखमींवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.