नागपूर : विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिक आणि स्वयंसेवी संस्था दक्ष झाल्या की सत्ता आणि नोकरशाही चटकन कामाला लागते. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्याची उपराजधानी नागपुरात याचाच प्रत्यय आला.


महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जनमंच आणि नागपूरकरांनी मिळून विकास कामांच्या निकृष्ट दर्जाची पोलखोल करण्याची मोहिम हाती घेतली. अवघ्या काही मिनिटात मंत्र्यांसह अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापालिका आयुक्तांनी सिमेंटच्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर कामाचा दर्जा निष्कृष्ट असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळेंनी मान्य केलं आणि कामात सुधारणा करु असं आश्वासनही दिलं.