Nagpur Winter Session : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील वरिष्ठ पदांच्या नियुक्तीवरुन आता मोठे वादंग निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या पदोन्नती आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्याने काही नियमभंग झाल्याचा विषय हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. संजय जाधव तांत्रिक पदावरुन येत असूनही त्यांना उपायुक्त पदावर नियुक्त केल्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
अधिवेशनात अनिल परब यांनी याबाबत प्रश्न मांडताच संजय जाधवां पदभार काढला
हिवाळी अधिवेशनात अनिल परब यांनी याबाबत प्रश्न मांडताच अखेर अनेक वर्षापासून संजय जाधव यांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्ताने तात्काळ त्यांच्याकडून त्यांचे पदभार काढत त्यांच्या मूळ पदावर त्यांना रुजू केले आहे. यामुळं जाधव यांचे अतिरिक्त आयुक्त बनण्याचे स्वप्न ‘थांबले’ असल्याची चर्चा राजकीय व प्रशासनिक वर्तुळात रंगू लागली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बेकायदेशीर वेतन वाढ आणि पदोन्नती दिली
संजय जाधव यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभाग ,माहिती व जनसंपर्क विभाग ,शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक विभाग ,समाज विकास विभाग मागासवर्गीय विभाग रात्र बेघर निवारा असे महत्वाच्या विभागाचे पदभार देण्यात आले होते. संजय जाधव तांत्रिक पदावर उद्यान अधीक्षक म्हणून भरती झाले होते. कायदेशीर रित्या तांत्रिक पदावर भरती झालेल्या कुठलाही अधिकारी अ तांत्रिक पदावर येऊ शकत नाही असा नियम असतानाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बेकायदेशीर वेतन वाढ आणि पदोन्नती देऊन जाधव यांना पाठीशी घातले.
वेळोवेळी तक्रार करुनही जाणीवपूर्वक संजय जाधव याला पाठीशी घालण्याचं काम
वेळोवेळी तक्रार करुनही जाणीवपूर्वक संजय जाधव याला पाठीशी घालण्यात आलेल्या सचिवांची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय जाधव बेकायदेशीररित्या सहा वर्ष सचिव पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. राजकीय वरदहस्त असल्याने संजय जाधव उच्च पदापर्यंत पोहोचल्याची चर्चा संजय जाधव उपायुक्त पदावरून अतिरिक्त आयुक्त बनण्यासाठी स्वप्न पाहत होते. मात्र हे स्वप्न धुळीस मिळाल्याने जाधव यांची धावपळ सुरू झाली आहे. संजय जाधव यांचा विषय हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी घेतल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या: