Harshvardhan Sapkal :  सत्ताधाऱ्यांना शर्म वाटली पाहिजे की अधिवेशन ते समोर रेटत आहेत. अधिवेशन कमी काळाचे आहे आणि विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीची थट्टा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal ) यांनी व्यक्त केले. दहा टक्केचा निकष हा कुठलाही संकेत नाही किंवा संवैधानिक स्वरुपात त्याचा उल्लेख नाही. वरच्या सभागृहात काँग्रेसचे दहा टक्के सदस्य आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रस्ताव सादर केलेला आहे असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले. 

Continues below advertisement

लोकशाहीची पायमल्ली न करता संविधानाचे पुरोगामित्व जोपासले जावं 

लोकशाहीची पायमल्ली न करता संविधानाचे पुरोगामित्व जोपासले जावं अशी अपेक्षा आहे. विरोधक आवश्यक आहेत. तुकाराम महाजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे तो सरकारने जोपासावा असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. अर्धा वेळ सत्ताधारी आणि अर्धा वेळ विरोधकांनी अधिवेशनात चर्चा करावी तेवढा वेळ त्यांना द्यावा. दोन्ही सभागृहाातील विरोधी पक्षनेत्याचा जो प्रश्न आहे तो निकाली काढावा असेही सपकाळ म्हणाले. जर देत नसतील तर यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असा अर्थ असल्याचे सपकाळ म्हणाले. 

उपमुख्यमंत्री पद हे निश्चितच असंवैधानिक

उपमुख्यमंत्री पद हे निश्चितच असंवैधानिक आहे. जे संविधानिक आहे विरोधी पक्षनेतेपद ते आपण देत नाही. या संविधानाला सभ्येतला आणि महाराष्ट्र धर्माला दाखवलेल्या वाकोळ्या आहेत असे सपकाळ म्हणाले. खालच्या सभागृहात शिवसेनेचे जास्त सदस्य आहेत. शिवनेनेने मागील विधानसभेत त्याचा प्रस्ताव सादर केलेले आहे. प्रस्ताव नसेल तर पुन्हा पाठवता येईल, खोळंबा करण्याची आवश्यकता नाही. 

Continues below advertisement

नुसत्या घोषणांचा पाऊस न पाडता, शेतकऱ्यांना थेट दिलासा द्यावा

स्वामीनाथन आयोग विदर्भातील शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा होता. नुसत्या घोषणांचा पाऊस न पाडता, शेतकऱ्यांना थेट दिलासा देणे, हे निर्णय शासनाने घेतले पाहिजेत अशी अपेक्षा या अधिवेशनात असल्याचे सपकाळ म्हणाले. 

दरम्यान. आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विविध मागण्या केल्या आहेत. या मागण्या  अधिवेशनात पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. अर्धा वेळ सत्ताधारी आणि अर्धा वेळ विरोधकांनी अधिवेशनात चर्चा करावी तेवढा वेळ त्यांना द्यावा असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे. नुसत्या घोषणांचा पाऊस न पाडता, शेतकऱ्यांना थेट दिलासा देणे, गरजेचे असल्याचेही सपकाळ म्हणाले.