Dhule News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जामन्या पाणी गावाच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी पाहणी केली असता वनविभागाच्या हद्दीत ही गांजाची लागवड करण्यात आल्याचे समोर आले आहे. सदर गांजाची झाडे ही पोलिसांनी प्रशासनाच्या निर्देशानंतर जाळून नष्ट केली आहेत. 

Continues below advertisement

वनविभागाच्या हद्दीतील तब्बल 122 गुंठे जागेतील अंदाजे 2 हजार 125 किलो गांजाची झाडे नष्ट

या संपूर्ण कारवाईत वनविभागाच्या हद्दीतील तब्बल 122 गुंठे जागेतील अंदाजे 2 हजार 125 किलो गांजाची झाडे नष्ट करून तब्बल 1 कोटी 6 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तर गांजाची लागवड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाबाबत अधिकची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, याबाबतची माहिती पोलीस अधिकारी घेत आहेत. तसेच आणकी कुठे अशा प्रकारे गांजाची शेती केली जात आहे का? याबाबतची माहिती देखील पोलीस प्रशासन घेत आहे. 

तुरीच्या शेतातून 45 किलो गांजा, पोलिसांनी धाड टाकून केला जप्त

नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी व झळकवाडी दरम्यान जंगलालगतच्या शेतीत इस्लापूर पोलिसांनी धाड टाकून गांजा जप्त केला. तुरीच्या शेतात लपवून ठेवलेली 40 ते 45 किलोपर्यंतची गांजाची झाडे उपटून पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणात एका नागरिकाला ताब्यात घेण्यात आले असून कारवाई सुरू आहे. गुप्त माहितीनुसार झालेल्या या कारवाईत हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पोलिस कर्मचारी, महसूल विभाग आणि नांदेड येथील फॉरेन्सिक पथक सहभागी झाले.

Continues below advertisement

गांजा कारवाईच्या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले, पोलिसांककडून चौकशी सुरु 

गांजा कारवाईच्या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांची कारवाई तूर्त सुरू आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर हिमायतनगर, इस्लापूर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शिवणी आणि झळकवाडी ही गावे तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहेत. तेव्हा इथे तेलंगणातून गांजा विक्री आणि मागणी होत असते? का याचा तपास सुरू आहे. या कारवाईत महसूल विभाग आणि नांदेड येथील फॉरेन्सिक पथक सहभागी झाले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
 
महत्वाच्या बातम्या: