Nagpur Unlock :  जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे.  राज्य सरकारच्या गाईडलाईन्सप्रमाणे नागपूर लेव्हल 1 मध्ये आहे, तरीही नागपुरात अनेक निर्बंध लावले गेले आहेत. नागपुरात बाजारासह बहुतांशी बाबी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरु असतील. पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. नागपूर लेव्हल 1 मध्ये असले तरी याआधी वाढलेलं कोरोना संक्रमण पाहता काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले. 

Continues below advertisement

राज्य सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे नागपूर शहर आणि जिल्हा जरी लेव्हल 1 मध्ये असला तरी स्थानिक प्रशासनाने ने नागपूरसाठी लॉकडाऊनमध्ये पूर्ण शिथिलता देण्याचे नाकारले आहे. आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत प्रशासनाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि त्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहता अनलॉक करताना संपूर्ण शिथिलता देण्यास प्रशासनाने नकार दिला. नागपुरात आता बाजारातील सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली असली तरी ती फक्त 5 वाजेपर्यंत राहणार आहेत.  तर रेस्टोरेंट, हॉटेल्स आणि बार हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहू शकणार आहे. मात्र, रेस्टोरेंट, हॉटेल्स आणि बारला त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीमध्येच सेवा देता येणार आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालयांना 100 टक्के उपस्थितीची परवानगी मिळाली असली तरी संध्याकाळी 5 वाजता कार्यालये बंद करावे लागणार आहेत.  शहरात आणि जिल्ह्यात सुरु असलेली जमावबंदी सुरु राहणार असून संध्याकाळी 5 वाजल्यानंतर त्याची कठोरतेने अंमलबजावणी केली जाणार आहे.  संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अनावश्यकरीत्या बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई होणार आहे..

उद्यापासून राज्यात अनलॉक! तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरू काय बंद? नागपुरात काय सुरु काय बंद आवश्यक वस्तू दुकाने - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील

इतर दुकाने ( अत्यावश्यक वगळून ) संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील

Continues below advertisement

रेस्टोरेंट 50  टक्के क्षमतेने रात्री 10 वाजे पर्यंत सुरू राहील

वॉकिंग सकाळी 5 ते 9, रात्री 5 ते 9 सुरु राहील

सरकारी व खाजगी ऑफिस 100 टक्के उपस्थितीने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहतील

मॉल्स, थिएटर, मल्टिप्लेक्स संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहणार.. (मॉल्समधील मल्टीप्लेक्समधील, थिएटरमधील लास्ट शोही 5 वाजता संपेल.

खेळाचे मैदान, क्रीडांगण सकाळी 9 वाजेपर्यंत

लग्न - 100 लोकांपर्यंत मर्यादा किंवा मंगल कार्यालयाची 50 टक्के क्षमता ( जे काही कमी असेल)

अंत्यसंस्कार जास्तीत जास्त 50 लोकांपर्यंत

जिम, सलून, पार्लर संध्याकाळी 5 वाजेपर्यत..

स्कुल, कॉलेज, कोचिंग क्लास बंद राहतील, त्यांचे प्रशासकीय काम सुरू राहू शकेल..

धार्मिक स्थळ बंद राहतील ( समितीचे 5 लोकं दैनंदिन पूजा आणि स्वच्छतेसाठी जाऊ शकतील )

राजकीय व धार्मिक कार्यक्रम, सोहळ्यांवर पूर्ण बंदी राहील.. 

सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त 100 लोकांच्या उपस्थतीत होऊ शकतील...

जमावबंदी संध्याकाळी 5 नंतर लागू राहील ( 5 पेक्षा जास्त लोकं जमा होऊन शकणार नाही )