Nagpur News : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीत (Wasankar Wealth Management Limited) गुंतवणूक केल्यानंतर पैसे दिले नाहीत, तर बॅक पेमेंटसाठी व्याजासह खरेदी-विक्री केल्याचं समोर आलं होतं. या संदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. कंपनीच्या इतर संचालकांप्रमाणे प्रशांत वासनकर यांना काही प्रकरणांत दिलासा मिळाला असला तरी खटला लवकर निकाली काढण्यासाठी फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्या. जी.ए.सानप यांनी या प्रकरणाची सुनावणी कोणत्या टप्प्यावर सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी विशेष न्यायालयाकडून (Special Court) अहवाल मागविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या (High Court) रजिस्ट्रीला दिले. याचिकाकर्त्याच्या वतीने न्या. जी.एस. गौर आणि सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील एच.डी. दुबे यांनी बाजू मांडली.
फक्त तपास अधिकाऱ्याचे जबाब नोंदवावे लागतात
सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात आता फक्त तपास अधिकाऱ्याचे जबाब नोंदवायचे आहेत. विशेष न्यायालयात तपास अधिकाऱ्याचे (investigating officer) जबाब व पुरावे नोंदवल्यानंतर ते पुढील कार्यवाहीसाठी ठेवण्यात येणार आहे. सरकारी बाजूच्या युक्तिवादाला विरोध करताना याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात 40 साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. दोन्ही बाजूंचे परस्परविरोधी युक्तिवाद पाहता विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी कोणत्या टप्प्यावर होते हे पाहावे लागेल, असे न्यायालयाने सांगितले.
एका आठवड्यात अहवाल द्या
या आदेशात सरकारी वकिलांना (Public Prosecutor) कनिष्ठ न्यायालयात हजर होणाऱ्या वकिलांकडून माहिती घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच विशेष न्यायालयाला आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही याचिका सुनावणीसाठी ठेवली जाईल. विशेष म्हणजे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, वित्तीय संस्थेविरुद्ध महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अॅक्ट -1999 अंतर्गत फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे खटल्याची सुनावणी सुरू राहिल्याने कंपनीच्या संचालकांना विनाकारण तुरुंगात राहावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली.
हे दोषारोप निश्चित
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.पी. सुराणा यांनी कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, व्यापाऱ्याने विश्वासघात करणे, धमकी देणे इत्यादी दोषारोप निश्चित केले आहेत. यापैकी व्यापाऱ्याने विश्वासघात करण्याच्या गुन्ह्यात जन्मपेठेच्या शिक्षेची तरतूद आहे.
ही बातमी देखील वाचा