आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालण्यास आठवलेंना विरोध
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2016 02:46 AM (IST)
नागपूर : नागपुरात रिपाइं नेते रामदास आठवले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यास समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसंच यावेळी रिपाइं आणि समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. रामदास आठवले भारत भीम यात्रा घेऊन नागपूरला आले होते. त्यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी ते आरबीआय चौकात पोहोचले. पण समता सैनिकांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. या प्रकारानंतर नागपुरच्या आरबीआय चौकात एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या प्रकरणी विरोध करणाऱ्या समता सैनिक दलाच्या 5 ते 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.