Nagpur News Updates: फायरिंगच्या सरावात गोळी निशाण्यावर का चालवली नाही, या रागातून गोळी चालवण्याच्या सरावादरम्यानच परीक्षकाने मारलेल्या पाच-सहा थप्पडांमुळे एका जवानाच्या दोन्ही कानातील पडदे फाटून दोन्ही कान बहिरे होण्याची वेळ आली आहे. नागपुरातील जुनापाणी फायरिंग रेंजमध्ये 22 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. पूनम खानवे असे पीडित जवानाचे नाव असून सुरुवातीला त्याच्या कानात फारसा त्रास झाला नाही, मात्र काही दिवसांनी त्रास वाढला. 


25 ऑक्टोबर रोजी त्यांना वैद्यकीय तपासणी केली असता, त्याच्या कानाचे पडदे फाटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पीडित जवानाने नागपूरच्या हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकारची तक्रार दिली आहे.
 
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या राज्यभरातील 50 सुरक्षा रक्षकांसाठी बंदुकीतून गोळी चालवण्याचे प्रशिक्षण आणि सराव हिंगणा मधील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक चार मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी पूनम खानवे हा 27 वर्षीय जवान 22 ऑक्टोबरच्या सकाळी जुनापाणी फायरिंग रेंजला पोहोचला होता. त्या ठिकाणी त्याने चालवलेल्या काही गोळ्या लक्ष्यावर लागल्या नाहीत. त्यामुळे तिथे परीक्षक म्हणून असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रुपेश लोखंडे यांनी पूनमला गाल आणि कानाजवळ पाच ते सहा थापड्या जोरात मारल्या.


तेव्हा थोडं दुखल्यानंतर पूनम या घटनेला विसरून गेला, मात्र 25 तारखेपर्यंत दुखणं वाढत जाऊन असह्य झाल्यानंतर त्याने पहिले चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आणि नंतर नागपुरात डॉक्टरांचा सल्ला घेतला. वैद्यकीय तपासणीत पुनमच्या दोन्ही कानाचे पडदे मारहाणीमुळे फाटल्याचे डॉक्टरांनी त्याला सांगितले. त्यानंतर पूनम खानवेने नागपूरच्या हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये परीक्षक रुपेश लोखंडे यांच्या विरोधात मारहाण करून कान बहिरे केल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोप लागलेल्या परीक्षकाविरोधात आयपीसीच्या कलम 325 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


गोळी चालवण्याच्या सरावादरम्यानच परीक्षकाने मारलेल्या पाच-सहा थप्पडांमुळे एका जवानाच्या दोन्ही कानातील पडदे फाटून दोन्ही कान बहिरे होण्याची वेळ आली आहे. नागपुरातील जुनापाणी फायरिंग रेंजमध्ये 22 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. पूनम खानवे असे पीडित जवानाचे नाव असून सुरुवातीला त्याच्या कानात फारसा त्रास झाला नाही, मात्र काही दिवसांनी त्रास वाढला. त्यानंतर पूनम खारवेने तक्रार दाखल केली.


ही बातमी देखील वाचा


Nashik Car Accident : नाशिकमध्ये मद्यधुंद 'साहेबरावा'चा 'कार'नामा! अनेक वाहनांना उडवलं, टायर फुटलं तरी थांबेना, चार जखमी