हत्याकांडामागे नागपूर-वर्धा रोडवर असलेली 5.5 एकर जागा कारणीभूत असल्याचा कयास पोलिसांनी बांधला आहे. 9 लाखांचा हा व्यवहार पूर्णत्वास गेलाच नाही. निमगडे आणि सिद्दीकी कुटुंबियांमध्ये न्यायालयीन लढाईसुद्धा सुरुच आहे.
दरम्यान या जमिनीवरुन शहरातले बिल्डर्स आणि राजकारणी धमकावत असल्याचा आरोपही एकनाथ निमगडे यांच्या मुलानं केला आहे. तर पोलिसांनी या हत्याकांडात कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा समावेश असल्याचा पुरावा नसल्याचं म्हटलं आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर सहा गोळ्या झाडल्या!
6 सप्टेंबरला मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना 72 वर्षीय निमगडे यांच्यावर अज्ञातांनी 6 गोळ्या झाडल्या. त्यानंतर उपचारादरम्यान निमगडेंचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच घडलेल्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती.