याच वेळी कवाडे यांनी उदयनराजे भोसले आणि राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. 'उदयनराजे आणि राज ठाकरें यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल केलेलं वक्तव्य हे अज्ञानातून आहे. तर शरद पवारांनी मात्र याबद्दल जाणीवपूर्वक वक्तव्य केलं आहे.'
'अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी कठोर करण्यात याव्या यासाठी 14 एप्रिल 2016 रोजी संसदेत या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. संसदेनं जेव्हा यात सुधारणा केल्या तेव्हा शरद पवार हे राज्यसभेत उपस्थित होते. त्यावेळी पवार साहेबांनी याबाबत मुद्दा उपस्थित का केला नाही?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर अॅट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे हे समजून घेण्याची गरज असल्याचं मत कवाडे यांनी व्यक्त केलं आहे.