वाढदिवशी केकमधून विष देऊन पत्नीच्या हत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2017 11:17 AM (IST)
वाढदिवसाला केकमधूनच विष देऊन पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. नागपुरातील वांजरा ले आऊट परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.
प्रातिनिधीक फोटो
नागपूर : वाढदिवसाला केकमधूनच विष देऊन पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. नागपुरातील वांजरा ले आऊट परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. 22 जुलै रोजी आलिया खान यांचा वाढदिवस होता. त्यावेळी आरोपी पती सलीम खान याने तिच्यासाठी केक आणला. मात्र या केकमध्येच विष घालून त्याने बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. केक खाल्ल्यानंतर आलिया यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी पती सलीम खान फरार झाला आहे. त्याच्यावर पत्नीच्या हत्येच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.