सांगली: सांगलीतील शामरावनगर मध्ये अलिना मलिक अमनगी या 14 महिन्याच्या बालिकेचा पाण्याच्या बादलीत पडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (रविवारी) संध्याकाळी ही घटना घडली.
अलिना ही आईनं दिलेलं कणीस खात होती. कणीस खात असताना ते समोरच असलेल्या पाण्याच्या बादलीत पडलं. पडलेलं कणीस काढण्यासाठी अलिना पाण्याच्या बादलीत वाकली. त्याचवेळी अलिनाचा अचानक तोल गेला. ज्यामुळे ती थेट बादलीतच पडली.
बादलीत पाणी असल्यानं तिच्या नाका-तोंडात बरंच पाणी गेलं. काही वेळानं अलिना पाण्याच्या बादलीत असल्याचं तिच्या घरातील लोकांना दिसून आलं. त्यांनी तिला तात्काळ बादलीतून बाहेर काढलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण की, अलिनाचा पाण्यातच गुदमरून मृत्यू झाला होता. तरीही तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
सांगलीत पाण्याच्या बादलीत बुडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2017 09:57 AM (IST)
सांगलीतील शामरावनगर मध्ये अलिना मलिक अमनगी या 14 महिन्याच्या बालिकेचा पाण्याच्या बादलीत पडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -