नागपूर : गणपतीसाठी बनवलेल्या महाप्रसादाच्या भांड्यात पडल्यामुळे पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिला वाचवण्याची शर्थ करणाऱ्या तिच्या वडिलांचा आणि बहिणीचा हात जळून ते गंभीर जखमी झाले आहेत.


माहुले कुटुंबाकडून परिसरातल्या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पासाठी महाप्रसाद देण्यात येणार होता. त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात काळी डाळ बनवण्यात आली होती. अंगणात खेळणारी पाच वर्षांची प्रिया अचानक या पातेल्यात पडली.


तिला वाचवण्याचे सगळे प्रयत्न करण्यात आले, मात्र काळी डाळ चिकट असल्यानं ती हातातून सुटली आणि पातेल्यात पडली. मात्र तिला वाचवण्यात यश आलं नाही.