नागपूर : नागपुरात गेल्या 24 तासात घडलेल्या चौथ्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. हिंगणा तालुक्यातील मांगली शिवारात एका तरुणाचा मृतदेह सकाळी सापडला आहे. हत्येचं कारण आणि युवकाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातील मांगली शिवारात एका तरुणाचा मृतदेह सापडला. या तरुणाची हत्या करुन त्याला फेकून देण्यात आलं आहे. सकाळी ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यातली ही चौथी हत्या आहे. खापा गावात 20 वर्षीय नामदेव पवारची हत्या झाली होती. तर सुभाषनगर भागात रोहित हातीबेंड या 25 वर्षीय युवकाची भोसकुन हत्या झाली होती.