नागपूर : स्वातंत्र्यदिनी नागपुरात रॅली काढून धिंगाणा घालणाऱ्या भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंतोली आणि राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन अशा दोन ठिकाणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 
स्वातंत्र्यदिनाची रॅली काढून डॉल्बीच्या तालावर मुन्ना यादव यांच्या मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी धुडगूस घातला होता. हा सर्व प्रकार एबीपी माझानं समोर आणला होता. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

 


स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत भाजप नेते मुन्ना यादवांच्या मुलांचा धिंगाणा


 
डॉल्बीचा मोठ्यानं आवाज करुन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर धांगडधिंगा घातला. काही जण बसच्या टपावर चढूनही नाचत होते. या सगळ्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाला.