राजू तिवारी... मूळचा पुण्याचा. नागपुरातल्या एका तरुणीशी राजूची ओळख झाली. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. सुखी संसाराची स्वप्नं दाखवली. लग्न केलं... पण हळूहळू राजू रंग दाखवू लागला.
राजूनं फ्लॅट बुक केला. तरुणीच्या नावाचे चेक वापरले.. डाऊन पेमेन्टसाठी पैसे घेतले. राजूला आर्थिक अडचण आली असेल म्हणून तरुणी आणि तिचं कुटुंब निर्धास्त होतं. पण एके दिवशी... त्याचा फोन स्विच ऑफ झाला. तो कायमचा...
पळून जाण्याआधी भामट्या राजू तिवारीनं उमरेडमधून एक सेकंड हॅण्ड स्कोडा कार मध्यप्रदेशातील खांडव्यातून चार लाखातून एक जेसीबी त्याने खरेदी केली.
धक्कादायक गोष्ट ही. की तक्रार दाखल करून 2 महिने लोटले आहेत. पण कारवाई शून्य लाखो रुपये गमावले. वरून देणेकऱ्यांचा ससेमिरा आणि त्यात अधांतरी आयुष्य. अशी परिस्थिती आणखी कुणावरही येऊ नये. त्यामुळे अशा नटवरलालांना तातडीनं जेरबंद करण्याची गरज आहे. शिवाय पोरींनीही सजग राहणं गरजेचं आहे
VIDEO: