नागपुरात बंदुकीच्या धाकाने पेट्रोलपंपावरुन मर्सिडीज पळवली
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2016 08:52 PM (IST)
नागपूर : चालकाच्या डोक्यावर बंदूक ठेवून आलिशान मर्सिडीज कार एका सराईत गुन्हेगाराने पळवली आहे. नागपुरात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेला असताना ही घटना घडली. कमलेश निंबार्ते असं आरोपीचं नाव असून त्याची पॅरोलवर सुटका झाली होती. डॉ. रविंद्र गोविंदवार यांच्याशी त्याचा 2 कोटींचा सौदा झाला होता. मात्र गोविंदवार यांच्याकडे आणखी पैसे असल्याची माहिती मिळताच त्यानं पेट्रोल पंपावर चालकाच्या डोक्यावर बंदूक ठेऊन गाडी पळवली. डॉ. रविंद्र गोविंदवार यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांना गाडी पुन्हा मिळाली असून पॅरोलवर पळालेला आरोपी कमलेशलाही अखेर अटक करण्यात आली आहे.