नागपूर : नागपुरात एका बांधकाम व्यावसायिकाने मोठी स्वप्नं दाखवत क्लास-वन दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच गंडवलं आहे. रामनाथ सिटी बांधणाऱ्या या बिल्डरने सगळ्यांना कसा गंडा घातला, हे आश्चर्यच आहे.
भकास प्रवेशद्वार, पडक्या भिंती, अर्धवट बांधलेली घरं, वाळून गेलेलं गार्डन, एखाद्या गटाराप्रमाणे दिसणारा स्विमिंग पूल... ही आहे रामनाथ सिटी... आणि इथं नागपुरातील क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्यांची घरं आहेत.
हाय कोर्ट जज, आयएएस अधिकारी, खाजगी कंपन्यांचे वाइस प्रेसिडेंट, आरबीआय अधिकारी, महाजनकोचे अधीक्षक-अभियंता अशा अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांची घरं चक्क लिलावाला निघाली आहेत.
बिल्डर सुदेश गुप्ता यांनी 2011 साली या प्रकल्पाची सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाच्या सिकॉमनंही प्रकल्पात भागिदारी केल्यानं अनेकांनी मोठ्या विश्वासानं घरं घेतली. तीही तगडी रक्कम देऊन.
अनेकांनी आयुष्यभराची कमाई घालून घरं घेतली, मात्र आयुष्य आनंदात घालवण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांचं आयुष्य आणखीच त्रासदायक झालं. अर्धवट घरं, सुकलेलं गार्डन, स्विमिंग पूलची झालेली गटारगंगा, लिफ्ट नाही, कचरा व्यवस्थापन नाही, अशा अनेक समस्या. त्यात सुरक्षाही रामभरोसे. तर बिल्डर सुदेश गुप्ता मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी नकार देत आहे.
नागपूरच्या बिल्डरचा न्यायमूर्तींसह क्लास वन अधिकाऱ्यांना गंडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jan 2018 06:08 PM (IST)
हाय कोर्ट जज, आयएएस अधिकारी, खाजगी कंपन्यांचे वाइस प्रेसिडेंट, आरबीआय अधिकारी, महाजनकोचे अधीक्षक-अभियंता अशा अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांची घरं चक्क लिलावाला निघाली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -