Nagpur Accident : नागपूर उमरेड मार्गावर विहीरगाव जवळील अड्याली फाट्याजवळ तवेरा कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नागपूर - उमरेड मार्गावर विहीरगाव जवळ भरधाव तवेरा कारने ट्रक ला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातामध्ये तवेरा कार चक्काचूर झाली असून या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिलेसह पाच पुरुषांचा समावेश आहे. तर एक जण जखमी आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा ट्रक वर जाऊन आदळली आणि समोरचा भाग चक्काचूर झाला.
Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात, कारची ट्रकला धडक, सहा जणांचा मृत्यू
रजत वशिष्ठ, एबीपी माझा | निलेश झालटे | 07 May 2022 07:21 AM (IST)
Nagpur Accident : नागपूरचा हा अपघात इतका भीषण होता की अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Nagpur Accident Six killed in car accident