नागपूरच्या शासकीय निरीक्षणगृहातून 21 मुलांचा पोबारा
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2016 02:40 AM (IST)
नागपूर : नागपूरच्या शासकीय निरीक्षणगृहातून 21 मुलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री 9 वाजल्याच्या सुमारास हे पलायननाट्य झाल्याचं वृत्त आहे. निरीक्षणगृहात हजर असलेल्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून ही मुलं फरार झाल्याची माहिती आहे. घटनेचं वृत्त मिळताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरु केली. यात 10 मुलांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. निरीक्षणगृहातून पळालेली इतर 11 मुलं अद्यापही फरार आहेत. याआधी 2013 साली याच निरीक्षणगृहातून 17 मुलं पसार झाली होती.