मुंबई: राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीच्या निकालाआधी अनेक दिग्गज नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण काही आमदारांच्या पत्नीच नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


जिल्हानिहाय प्रतिष्ठेच्या लढती

परतूर (जालना) - मंदाताई लोणीकर :  पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी

जालना : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नीही जालन्यातून नगराध्यक्षपदासाठी

अमरावती : निलीमा भारसाकळे - आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी

अंमळनेर (जळगाव) :  अनिता चौधरी - अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी

अंमळनेर (जळगाव) : पुष्पलता पाटील - माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी

भुसावळ (जळगाव) : सचिन चौधरी - माजी आमदार संतोष चौधरी यांचा मुलगा

धुळे : नयनकुवरताई रावल - रोजगार हमी योजना आणि पर्यटनमंत्री राजकुमार रावल यांच्या मातोश्री

धुळे : रवींद्र देशमुख - माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे भाऊ

पुसद (धुळे) : अनिता नाईक - माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी

शिरपूर (धुळे) : जयश्रीबेन पटेल - विधान परिषद आमदार अमरीश पटेल यांच्या पत्नी

बुलडाणा : संजय जाधव - शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू

करमाळा (सोलापूर) : वैभवराजे जगताप - माजी आमदार जयंतराव जगताप यांचे पुत्र

बार्शी (सोलापूर) : योगेश सोपल - माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पुतणे

संगमनेर (अहमदनगर) : दुर्गा तांबे - विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहिण

राहाता (अहमदनगर) : सुजय विखे - राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव

श्रीरामपूर (अहमदनगर) : अनुराधा आदिक - दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या कन्या

परळी (बीड) : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला

बीड : संदीप क्षीरसागर - माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे

सातारा : वेदांतिकाराजे भोसले - आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी

तासगाव (सांगली) : स्मिता पाटील - दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या

तासगाव (सांगली) : प्रभाकर पाटील - भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र

रोहा (रायगड) : संदीप कटकरेंचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आव्हान

राजुरा (चंद्रपूर) : सतीश धोटे - भाजपचे आमदार संजय धोटे यांचे भाऊ